स्वप्नांच्या सागरात माझी
नाव चालते पुढे
तुझीच प्रतिमा दिसू लागते
क्षितीजाच्या पलीकडे...
आभास मला होऊ लागती
दिशा-दिशांतून तुझे
तुला शोधताना जाणवते
अस्तित्व, तूच माझे...
अनिवार ओढ तुझी लागते
व्याकुळ ह्रदयाला
कातर झाल्या आतुर नजरा
तुझ्या दर्शनाला...
दूर किनारा, तूच सहारा
आता जगण्यासाठी
लाटांवरती आज स्वार मी
केवळ तुझ्याचसाठी...
सरतो आता संयम माझा
अंत तू पाहू नको,
एकदा तू भेट आणि
दूर तू जाऊ नको...!!!
No comments:
Post a Comment