शुभेच्छापत्र लेखन हा माझा एकेकाळचा व्यवसाय, छंद, अभिव्यक्ती आणि बरंच काही... या ब्लॉगच्या माध्यमातून अशाच काही शुभेच्छा संदेश रचना आपल्यासमोर सादर करायचा मानस आहे. हे पूर्णपणे स्वरचित लेखन आहे, मात्र त्यांच्या माध्यमातून कुणाला आपल्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर माझी हरकत नाही. कारण भावना पोहोचवण्याचा आनंद माझ्या लेखी मोलाचा आहे. प्रतिक्रियांचेही स्वागत आहे
Thursday, 11 July 2013
Saturday, 30 March 2013
तिला समुद्र आवडतो...
तिला समुद्र आवडतो...
तिला पाऊसही आवडतो...
आणि हे त्याला चांगलंच ठाऊक आहे
तिचा रूसवा कळतो त्याला
तो कसा काढायचा, हे सुद्धा कळतं...
पाठीवर स्पर्श जाणवला की
सुसाट सुटतो तो
काही बोलत नाही, विचारतही नाही
ती तिच्याच रूसव्यात दंग
एक हलका धक्का आणि समोर पसरलेला समुद्र
ती शांत.. स्तब्ध.. सुखावलेली...
समुद्राच्या दिशेने धावलेली...
वळून त्याच्याकडे बघताना
भरून आलेलं आभाळ
अवचित आलेला पाऊस
आणि वाहून गेलेला रूसवा...
Subscribe to:
Posts (Atom)