Saturday, 5 January 2013

तुझं-माझं?...आपलं...

तुझी ओळख पटली आणि

माझं मलाच नवल वाटलं

     तुझ्यावरल्या विश्वासाचं

     नवल माझ्या मनात दाटलं...


तुझं माझ्या विश्वात येणं

कसं अगदी सहज झालं

     कळलंच नाही कधी तुझ्यात

     माझं विश्व भेटत गेलं...


तुझ्या नजरेत माझी स्वप्नं

उमलताना दिसली मला

     सुखद भविष्याची चाहूल

     तूच दिली या ह्रदयाला...


तुझी ओळख पटली आणि

तुझं-माझं उरलं नाही

     नवं-नूतन वाटू लागलं

     जगात मला सारं काही...


एकच स्वप्न आता माझ्या

मनामध्ये मी जपलं

     अतूट नातं कायम राहो

     तुझं- माझं... आपलं....


No comments:

Post a Comment