Tuesday, 22 January 2013

पावसाच्या पावलांनी...


पावसाच्या पावलांनी

कविता येते

सर होऊन

चिंब भिजवते

अंकुर होऊन

मनात रूजते

तरारून उठते

नकळत लाजते

कविता येते

पावसाचं बोट धरून

आल्या पावली

परत जाते

कविता जाते...

No comments:

Post a Comment