Tuesday, 22 January 2013

कळलंच नाही...



कोंदटलेलं आभाळ

कधी भरून आलं

कळलंच नाही...

पांढरेशुभ्र ढग

काळेभोर झाले

बरसून गेले

तरीही पाऊल

वळलंच नाही...

टपोरे थेंब

गालावर रूळले,

मातीत मिसळले

पापणीमधलेही...

कधी, कसे ते

मिसळून गेले

कळलंच नाही,

कळलंच नाही...




 

No comments:

Post a Comment