Monday, 3 December 2012

नेमकं काय झालं...

तुझ्या प्रेमात पडल्यानंतर

नेमकं काय झालं?

कळलंच नाही, माझं मी पण

कुठे हरवून गेलं...


तुझ्या प्रेमात पडल्यानंतर

जगणं वेगळं झालं

रोजचं चालणं, रोजचं बोलणं

ते ही सुंदर झालं...


तुझ्या प्रेमात पडल्यानंतर

नव्याच मी ची ओळख पटली

तुझ्या साथीची एकच आशा

माझ्या ह्रदयामध्ये दाटली...


तुझ्या प्रेमात पडल्यानंतर

उरली नाही कसली चिंता

आयुष्य सरो तुझ्या साथीने

एकच इच्छा उरली आता...!!!

No comments:

Post a Comment