बसल्या-बसल्या सहजच
छान तंद्री लागते
बघता-बघता डोळ्यांना
तुझी छबी दिसते
हे खरं की, हा ही भास?
काही कळत नाही
क्षणभरसुद्धा तुझ्यावरून
नजर वळत नाही...
वाटतं, पापणी क्षणभर लवली
तरी आक्रीत होईल
क्षणात माझ्या नजरेपुढून
तुझी छबी जाईल...
मग तुझे डोळे हसतात
ओठ बोलु लागतात
भास नाही, हे खरंच
माझेही ओठ हलतात
त्याच क्षणी नकळत
माझी पापणी लवते
तुझी छबी हरवते...
आणि मग पुन्हा एकदा
माझी तंद्री लागते...
छान तंद्री लागते
बघता-बघता डोळ्यांना
तुझी छबी दिसते
हे खरं की, हा ही भास?
काही कळत नाही
क्षणभरसुद्धा तुझ्यावरून
नजर वळत नाही...
वाटतं, पापणी क्षणभर लवली
तरी आक्रीत होईल
क्षणात माझ्या नजरेपुढून
तुझी छबी जाईल...
मग तुझे डोळे हसतात
ओठ बोलु लागतात
भास नाही, हे खरंच
माझेही ओठ हलतात
त्याच क्षणी नकळत
माझी पापणी लवते
तुझी छबी हरवते...
आणि मग पुन्हा एकदा
माझी तंद्री लागते...
No comments:
Post a Comment