Thursday, 22 November 2012

सांग बरं कोणाला, इतकं कसं छळायचं?

दिवसभर सोबत राहून

रात्री पुन्हा स्वप्नात यायचं

     सांग बरं कोणाला

     इतकं कसं छळायचं...


तू म्हणशील, तुला हे

काही नाही कळायचं

     तुझं सारं असंच असतं

     अर्धवट बोलायचं...

खूप-खूप छळून मग

डोळ्यात खोल बघायचं

     एका क्षणात रूसवा काढून

     पुन्हा मधाळ हसायचं...


कसलं वेड लावलयस मला

तुझ्या प्रेमात पडायचं

     सांग बरं कोणाला

     इतकं कसं छळायचं...

No comments:

Post a Comment