Thursday, 22 November 2012

तुझ्या प्रेमात पडल्यापासून...

तुझ्या प्रेमात पडल्यापासून

अर्थ बदलला जगण्याचा

कळत नाही मला बरेचदा

अर्थ, माझ्याच वागण्याचा...


दिवसा स्वप्नं पडत राहतात

रात्री झोप लागत नाही

तुझ्याशिवाय दिवसातला

एकही क्षण जात नाही...


तुझी सोबत नसतानाही

तुझीच सोबत सोबत असते

मला चिडवून, मला फसवून

मला चांगलीच भंडावून सोडते...


तुझ्या प्रेमात पडल्यापासून

असंच होऊ लागलंय बघ

दुसरं काही सुचत नाही

तुझ्यापुरतंच उरलंय जग...!

No comments:

Post a Comment