प्रेमात पडलेली माणसं
कविता करू लागतात
कारण नसताना उगीचच
मनात झुरू लागतात...
प्रेमात पडलेली माणसं
माझ्यासारखी बावरतात,
आपलं माणुस समोर आलं की
क्षणात, चटकन सावरतात...
प्रेमात पडलेली माणसं
तुझ्यासारखी वेडावतात
माझ्यासारख्या माणसांना
पुन्हा-पुन्हा प्रेमात पाडतात...
प्रेमात पडलेली माणसं
तुझ्या-माझ्यासारखी असतात
आपल्या त्या माणसातंच
कायम आपलं जग शोधतात...!!!
कविता करू लागतात
कारण नसताना उगीचच
मनात झुरू लागतात...
प्रेमात पडलेली माणसं
माझ्यासारखी बावरतात,
आपलं माणुस समोर आलं की
क्षणात, चटकन सावरतात...
प्रेमात पडलेली माणसं
तुझ्यासारखी वेडावतात
माझ्यासारख्या माणसांना
पुन्हा-पुन्हा प्रेमात पाडतात...
प्रेमात पडलेली माणसं
तुझ्या-माझ्यासारखी असतात
आपल्या त्या माणसातंच
कायम आपलं जग शोधतात...!!!
No comments:
Post a Comment