तू असताना सोबत माझ्या
घड्याळ धावतं वेगाने,
तू नसताना वैरी होतं
संथ सरकतं हट्टाने...
तू असताना सोबत माझ्या
चिंता सा-या मावळतात
तू नसताना कारण नसता
उगीच येवून सतावतात...
तू असताना सोबत माझ्या
हवे-हवे सारे वाटे
तू नसताना, तू नसल्याचे
दु:खच मनात दाटतसे...
तू असताना, तू नसताना...
तूच असावे सोबतीला,
नित्य असावे सोबतीला
तूच असावे सोबतीला...!
No comments:
Post a Comment