Tuesday, 20 November 2012

जगण्यासाठी माणसाला काय हवं असतं...

जगण्यासाठी माणसाला

काय हवं असतं

आपलं एक प्रेमाचं माणुस

सोबत हवं असतं


आनंद वाटून घ्यायला

हवंच असतं कोणी

जीवा-भावाच्या माणसासमोर

निपटावं डोळ्यातलं पाणी


असं एक आपलं माणूस

मला तुझ्यात सापडलं

फक्त एका नजरेतंच

मला तू आपलं केलंस


जगण्यासाठी आता मला

सोबत हवी फक्त तुझी

तूच केवळ आहेस आता

आशा माझ्या जगण्याची...

No comments:

Post a Comment