Thursday, 22 November 2012

प्रेमात पडण्यात खरोखर केवढं सुख आहे...

प्रेमात पडण्यात खरोखर

केवढं सुख आहे

तुझं सोबत असणंही

मला खूप आहे...


माझ्या प्रत्येक पावलावर

तुझी साथ आहे

नवं पाऊल उचलताना

हाती हात आहे...


किती दिवस आले-गेले

आणखी येतील-जातील

तुझ्या-माझ्या नात्याला

आणखी घट्ट करतील...


प्रेम म्हणजे खरोखर

तू, तूच आहेस

प्रेमात पडण्यात खरोखर

केवढं सुख आहे...!!!

No comments:

Post a Comment