Thursday, 22 November 2012

जुनी सवय आहे तुझी...

हात हाती घेउन मग

नजरेत नजर गुंतवायची

     जुनी सवय आहे तुझी

     मला फशी पाडायची...


सगळं लक्षात ठेवूनसुद्धा

पुन्हा माझी फसगत होते

     तुझी असली लबाडीही

     उशीराच माझ्या लक्षात येते...


पण तुला झालीय सवय

     मला असं फसवायची

आणि तुला खरं सांगू,

     मलासुद्धा, फसायची...

मला फसलेलं पाहून मग

     तुझ्या डोळ्यात उमटणारं

हसू पाहून हसायची...

     जुनी सवय आहे तुझी...

मला फशी पाडायची...




No comments:

Post a Comment