Thursday, 1 November 2012

भावोजी...

बहिण माझी शुक्र चांदणी

     चंद्र तुम्ही शोभता

चंद्रासमान स्नेहल आणि

     प्रसन्न तुम्ही भासता


आपुलकीने तुम्ही जोडता

     प्रत्येकाशी नाते

उगीच नाही बहिण माझे

     तुमचेच गुण गाते


तुमच्यासाठी याच शुभेच्छा

     आज जन्मदिवसाला

भगवंताने सुखसौख्याचे

     वर द्यावेत तुम्हाला...!


तुमच्यासाठी जन्मदिवसाच्या

     मन:पूर्वक शुभेच्छा!!!

No comments:

Post a Comment