Thursday, 1 November 2012

वहिनी..


वहिनीच्या नात्याने जरी तू

प्रवेश केला घरात या

आपुलकीने, जिव्हाळ्याने

घर केले तू मनात या...


दुधात साखर जशी विरघळे

तशीच झालीस एकरूप तू

मने जिंकलीस तू सा-यांची

गोड स्वभावाची ही जादू...


प्रसन्न, सुंदर व्यक्तित्व तुझे

असेच सदैव बहरत राहो

जन्मदिनी या तुला शुभेच्छा

प्रिय वहिनी तू, सौख्यायुषी हो...!!!

No comments:

Post a Comment