तुझी मैत्री म्हणजे माझ्या
आयुष्याचं होकायंत्र
तुझा विश्वास माझ्यासाठी
साफल्याचा गुरूमंत्र!
मित्रा, तूच देतोस दिशा
आनंदाची, जगण्याला
तुझीच मैत्री पुरून उरते
माझ्या प्रत्येक प्रश्नाला
अनुबंध हे तुझ्या मैत्रीचे
असेच राहो दृढ, चिरंतन
समृद्धीने, आनंदावे
बहरावे, तव अवघे जीवन...
तुझ्यासाठी वाढदिवसाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा!!!
No comments:
Post a Comment