Thursday, 25 October 2012

बहीण...



बहीण असावी

     तुझ्यासारखी

बहीण नव्हे तू

     प्राणप्रिय सखी...


आपुलकीने अन् स्नेहाने

     मला कितीदी तू सावरले

तुझ्या साथीने बालपणीचे

     सारे क्षण सोनेरी झाले


भेट त्याच अनमोल क्षणांची

       सादर करीत आज तुला

आयुष्य तुझे सुखमय व्हावे

     याच शुभेच्छा आज तुला...!!!

No comments:

Post a Comment