Thursday, 25 October 2012

भाऊ...



तुझं-माझं जमेना

असं कितीही म्हटलं तरी

तुझ्याविना करमेना

मान्य मला हे अंतरी...


भाऊ असावा तुझ्यासारखा

खट्याळ तरीही समजुतदार

बालपणाचा प्रवास झाला

तुझ्या साथीने खुमासदार


असे अनोखे सख्य आपुले

दृढच व्हावे निशिदिनी

तुझ्या जीवनी हर्ष फुलावा

हीच कामना आज मनी...


तुझ्यासाठी वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!! 

No comments:

Post a Comment