Thursday, 25 October 2012

चिरंजीवा...



आयुष्याच्या नवीन वर्षात

     आज तुझं होतंय पदार्पण

आणि मला अजून आठवतंय

     तुझं निरागस, रेशमी बालपण...


...तुझं रूसणं, कधी हसणं

     सारं काही लोभसवाणं

तुझ्या पाऊली जीवनात या

     आनंदाचं झालं येणं


रूपात तुझ्या सदैव दिसते

     माझीच प्रतिमा नित्य मला

चिरंजीवा तू शतायुषी हो,

     आशिष हेच आज तुला...!


तुझ्यासाठी जन्मदिनाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा!!! 

No comments:

Post a Comment