भगवंताला भक्त आळवी
माऊली म्हणुनी
भगवंताहून वंद्य मला तू
आई तू माऊली...
आयुष्याला पुनीत केले
आई तू वात्सल्याने
मनात माझ्या जागवला तू
स्नेहभाव साकल्याने
माझ्या आनंदाला जोड
तुझ्याच आशिर्वादाची
माया ममता तुझीच देते
नवी प्रेरणा जगण्याची
जीवनभर मज साथ मिळावी
आई तुझ्या वात्सल्याची
जन्मदिनी या तुला शुभेच्छा
आई, दीर्घायुष्याची!!!
No comments:
Post a Comment