बाबा, तुम्ही म्हणजे
जीवनाच्या पंचतत्वांशी
माझी पहिली ओळख
आणि मग
एक अनोखी सोबत
आयुष्यभरासाठी...
धरतीसारखा अचल आधार
पावलो-पावली दिलात
आकाशाएवढं स्नेहाचं छत्र
माझ्यासाठी झालात
प्रेरणेचं, उत्साहाचं
तेज दिलंत जगण्याला
आपुलकीच्या वर्षावात
भिजवलंत या ह्रदयाला...
आयुष्याच्या प्रवासात
दिलासा देणारी झुळुक तुम्ही,
जीवनाचं सार मिळवलं
तुमच्या सहवासातून आम्ही
बाबा, तुमचे अखंड आशिष
मला मिळावे निशिदिनी
आशिष देण्या बाबा तुम्ही
शतायुषी व्हावे जीवनी...!
No comments:
Post a Comment