Monday, 1 October 2012

प्रश्नच...


आपल्याच मनात गजबजलेलं
आठवणींचं छोटंसं बेट

अवचित कुठून जाग्या होऊन

डोळ्यांमध्ये बघतात थेट


शहारा, अंगभर...
थंडीचा, आठवणींचा

कळत नाही...


तुझ्यापासून स्वत:ला
हट्टाने वेगळं केलंय...

खरंच केलंय?

की तो सुद्धा भ्रमच..


आहेस... आता आहेस...
नाहीस... कधीच नव्हतास...

मग, का आलास,
आणि का गेलास

 
तू म्हणजे प्रश्न
   मी म्हणजे...

तू प्रश्न असलास म्हणजे,
   मी उत्तरच असायला हवं का?

अजिबात नाही.
   मी म्हणजे सुद्धा...प्रश्नच...

No comments:

Post a Comment