Friday, 19 October 2012

ताई...


विश्वासाचा अन् स्नेहाचा

हवाहवासा तू संगम

ताई, तू या जीवनातली

आनंदाची मधुसरगम...


आसमंत अवघा सुखावतो

ताई तुझ्याच येण्याने

प्रसन्नतेची देणगी तुला

दिधली का परमेशाने


विचार केला परी न मिळते

उत्तर माझ्या प्रश्नाचे

एक खरे पण, तू म्हणजे तर

कारण माझ्या हर्षाचे...


ताई तुझं अवघं जीवन तुझ्यासारखंच बहरत राहो

याच तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...!!! 

No comments:

Post a Comment