Thursday, 25 October 2012

सुकन्ये...




साद तुझी पहिलीच कोवळी

अजून घुमते मनात माझ्या

पखरण करीत आनंदाची

आलीस तू जीवनात माझ्या


गोड बोबड्या बोलांनी तू

जिंकलेस माझ्या ह्रदयाला

एक ईश्वरी वरदानच तू

माझ्या अवघ्या आयुष्याला


आज वाटते, जे जे मंगल

ते ते सारे तुला मिळावे

सुकन्ये तुझे जीवन सारे

नंदनवन होऊन फुलावे...


तुझ्यासाठी जन्मदिनाच्या स्नेहल शुभेच्छा !!! 

No comments:

Post a Comment