Wednesday, 26 September 2012

पावसाचं गाणं...? पाऊसच गाणं...


पावसाचं गाणं?

पाऊसच गाणं... 

तळव्यावर झेलायचं

थेंबांना पेलायचं

तहानलेल्या ओठांनी

पावसासवे बोलायचं

पावसाचं गाणं?

पाऊसच गाणं...

सरींच्या तालावर

आपणही मोर व्हायचं

बेभान होऊन नाचायचं

कानामध्ये प्राण आणून

मनामध्ये साठवायचं

पावसाचं गाणं?

पाऊसच गाणं...

चिंब चिंब भिजायचं

थेंब लेवून सजायचं

पावसालाच कवेत घेऊन

पाऊस होऊन रुजायचं

पावसाचं गाणं...

पाऊसच गाणं...

No comments:

Post a Comment