Friday, 7 September 2012

पाऊस पडू लागल्यावर

पाऊस पडू लागल्यावर

लोकं पळतात सैरावैरा

पावसापासून वाचण्यासाठी...

पाऊस पडू लागल्यावर

मी ही पळते सैरावैरा

डोक्यावरला निवारा सोडून

पावसाला गाठण्यासाठी...

ओल्याचिंब पावसात

मनापासून भिजण्यासाठी...

कोण वेडं...?

लोकं...? ...मी...?

अं ह....

वेडा पाऊस....

 

No comments:

Post a Comment