तिला समुद्र आवडतो...
तिला पाऊसही आवडतो...
आणि हे त्याला चांगलंच ठाऊक आहे
तिचा रूसवा कळतो त्याला
तो कसा काढायचा, हे सुद्धा कळतं...
पाठीवर स्पर्श जाणवला की
सुसाट सुटतो तो
काही बोलत नाही, विचारतही नाही
ती तिच्याच रूसव्यात दंग
एक हलका धक्का आणि समोर पसरलेला समुद्र
ती शांत.. स्तब्ध.. सुखावलेली...
समुद्राच्या दिशेने धावलेली...
वळून त्याच्याकडे बघताना
भरून आलेलं आभाळ
अवचित आलेला पाऊस
आणि वाहून गेलेला रूसवा...
masttttt
ReplyDeleteब्लॉगवर प्रतिक्रिया देणारी तू पहिलीच.मनापासून आभार.
Deleteछान ।।।।
ReplyDelete