तुम्ही
दोघांनी
एकमेकांच्या
हाती हात दिलात,त्याला वर्ष झालं...
या वर्षभरात एकमेकांवर रूसला असाल,
एकमेकांबरोबर हसला असाल,
वर्षभरातले असंख्य क्षण
एकमेकांबरोबर जगला असाल...
ही
तर सुरूवात आहे...
कुणीतरी
म्हटलंय ना...“सुरूवात चांगली झाली की प्रवास उत्तम होतो.”
तुमचीही सुरूवात चांगली झालीय.
सहजीवनाचा प्रवासही असाच उत्तम व्हावा, याच शुभेच्छा!!!
No comments:
Post a Comment