किती दिवसांचं साठवून
एकाच वेळी बोलायचं
असंच होतं अलीकडे...
वेळ असतो,
मी असते अन् तू ही असतोसतरीही
टाळत राहतो बोलणं...आपण...
खूप दिवस... खूप काळ...
मग बांध फुटतो...
पलिकडे तू, अलिकडे मी...
समोर असतो ना तर
बोलावंही लागलं नसतं
पण बरय
समोर नाही, तेच बरं आहेतेच बरोबर आहे
एक चूक, एक थांबा... शिक्षा मात्र दोघांना
तुला तशी... मला अशी...दु:खी नाही मी... तू ही नाहीस...
तरी तडफड
कळते फक्त, माझी तुला...तुझी मला...
No comments:
Post a Comment