Friday, 31 August 2012

काल संध्याकाळी दिवस मावळताना अवचित संधीप्रकाश पसरला. माझा खूप-खूप आवडता संधीप्रकाश.... त्याने दिलेली ही कविता...

 


केशरल्या प्रकाशात

      मोहरल्या दिशा दाही

मनाचिया पटावर

      उमटले वेडे काही

सूर्य दिसेना दिसेना

      खूण चंद्राची पटेना

तरी हूरहूर दाटे

      जीव वेडावून जाई

      जीव वेडावून जाई....!



No comments:

Post a Comment